सोन्याच्या दराने ऐतिहासिक टप्पा गाठला, तोळ्याला 40 हजारांचा भाव

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानात सोन्याच्या भावाने आतापर्यंतचे सारे रेकॉर्ड मोडले आहेत. सराफा बाजारात सोन्याच्या दराने सोमवारी 40 हजारांचा पल्ला गाठला आहे. आगामी काळात दिवाळीसह सण-वार सुरू होणार असल्याने दागिन्यांची मागणी वाढेल, त्यामुळे सोन्याच्या दरातदेखील आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

‘ऑल इंडिया सराफा असोसिएशन’ने दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी सराफ बाजार उघडताच सकाळी 11 वाजताच्या सुमारास सोन्याचा दर 39 हजार रुपये होता. साधारण दीड वाजताच्या सुमारास सोन्याच्या भावाने 40 हजाराचा टप्पा ओलांडला. सोन्याबरोबर चांदीचा दरही 45 हजारांच्या पलीकडे गेलेला आहे.

अमेरिका व चीनने सोन्याची खरेदी वाढविल्याने, तसेच अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयात झालेल्या घसरणीमुळे दोन महिन्यांपासून सोने-चांदीचे भाव चांगलेच वाढत आहेत. यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.