सोने एक लाखाच्या खाली, चांदीही स्वस्त

सराफा बाजारात सोन्याच्या किंमतीत किरकोळ घसरण झाली आहे. सोने पुन्हा एकदा एक लाखाच्या खाली आले. गुरुवारी 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति तोळा 99,971 रुपयांपर्यंत खाली आहे. तर 22 कॅरेट सोन्याची किंमत 91,573 रुपये प्रति तोळा झाली आहे. बुधवारी सायंकाळी 24 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 1 लाख 97 रुपये होता. चांदीच्या दरातसुद्धा घसरण झाली असून चांदी प्रति किलो 1,15,100 रुपये झाली.