लग्नाच्या मुहुर्तावर पडले सोन्या चांदीचे भाव, खरेदीसाठी करा लगबग

दिवाळी झाली असून आता लग्नाच्या मुहुर्तांना सुरूवात झाली आहे. अशा वेळी एक चांगली बातमी समोर येत आहे. हिंदुस्थानात सोने चांदीचे भाव कमी झाले झाले आहेत. लॉकडाऊनमुळे सोन्या चांदीच्या किंमतीत घसरण झाली आहे.

american-dollar-gold

गेल्या दोन दिवसांत 1200 रुपयांनी सोन्याची किंमत कमी झाली आहे. सोन्याची किंमत प्रति तोळा सध्या 49 हजार 51 वर पोहोचली आहे. तर चांदीची किंमत 0.09 टक्क्यांनी कमी झाली असून प्रतिकिलो 59 हजार 980 रुपये झाली आहे. चांदीच्या किंमतीत 550 रुपयांनी घट झाली आहे.

gold

स्पॉट गोल्डची किंमत 0.6 टक्क्यांनी कमी झाली असून प्रति औंस 1 हजार 826 डॉलरवर पोहोचली आहे. जुलैनंतर हा सर्वात नीच्चांकी दर आहे. चांदीच्या किंमतीत 1.1 टक्क्यांनी घट झाली आहे.

gold-rate

आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीच्या किंमतीवर दबाव दिसून आला. डिलिव्हीरी सोन्याच्या किंमतीत 7 डॉलरने घटले आहे. तसेच चांदीच्या किंमतीतही 24.35डॉलरने घटली आहे.

gold

आपली प्रतिक्रिया द्या