पाच दिवसात चौथ्यांदा सोनं झालं स्वस्त, चांदीतही घसरण; जाणून घ्या 5 प्रमुख शहरातील आजचा भाव

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बुधवारी देशातील सराफा बाजारात सोने-चांदीच्या दरात घसरण पाहायला मिळाली. गेल्या पाच दिवसात चौथ्यांदा सोन्याचा दर खाली आला आहे. आज सोन्याचा दर 0.4 टक्के खाली आला आणि 10 ग्राम (1 तोळा) सोन्याची किंमत 51 हजार 140 रुपयांवर स्थिरावली. दुसरीकडे चांदीच्या दरातही 0.75 टक्के घसरण झाली आणि 1 किलो चांदीचा दर 627 हजार 982 रुपये झाला.

gold
गेल्या महिन्यात सोने-चांदीच्या दराने आसमान गाठले होते. सोने 56 हजार 200 रुपयांच्या विक्रमी स्तरावर पोहोचले होते, तर चांदीही 74 हजारांच्या वर गेली होती. मात्र महिन्याभरात सोन्याचा दर 5 हजार रुपयांनी खाली आला, तर चांदीची किंमतही 7 ते 8 हजार रुपयांनी कमी झाली.

gold

आंतरराष्ट्रीय बाजारात अमेरिकन डॉलर मजबूत झाल्याने सोन्याच्या किंमतीत जास्त बदल दिसले नाहीत. मागच्या सत्रात सोन्याचा दर 1 हजार 906।.24 डॉलर प्रति औसवर आलेला सोन्याचा दर आज 1 हजार 929.30 डॉलर प्रति औस झाला. तर चांदीच्या किंमतीत घट झाली आणि 0.2 टक्के घसरण होऊन प्रति औस चांदीचा दर 26.66 डॉलर झाला.

gold-chain-a

देशातील 5 प्रमुख शहरातील 1 तोळा (24 कॅरेट) सोन्याचा दर

मुंबई – 50 हजार 550
पुणे – 53 हजार 190
चेन्नई – 53 हजार 290
दिल्ली – 54 हजार 310
कोलकाता – 53 हजार 980