लातूरमध्ये चोरट्यांनी दोन घरे फोडली; 2 लाख 29 हजारांचा ऐवज लांबवला

theft cirme
प्रातिनिधिक फोटो

लातूर शहरातील गंगासागर रेसिडेन्सी भागातील दोन घरे अज्ञात चोरट्यांनी फोडली. एका घरातून सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा सुमारे 2 लाख 29 हजार 800 रुपयांचा ऐवज पळवण्यात आला तर दुसऱ्या घरातील सुमारे 2 हजाराचे नुकसान करण्यात आले.

या संदर्भात विवेकांनद चौक पोलीस ठाण्यात मनोजकुमार पंढरीनाथ केदार (रा. परळी वैजनाथ ता.बीड) यांनी याची तक्रार दिली आहे. अज्ञात चोरट्यांनी तक्रारदारांच्या घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला.

कपाटात ठेवलेले सोन्याचे, चांदीचे, प्लॅटिनीयमचे वेगवेगळया प्रकारचे दागिने ( किंमत 1 लाख 71 हजार रुपये आणि रोख रक्कम 58 हजार 800 रुपये) असा एकूण 2 लाख 29 हजार 800 रुपयांचा ऐवज चोरुन नेला.

तक्रारदारांच्या शेजारच्या घराचे कुलूप तोडून 2 हजार रुपयांचे नुकसान करण्यात आले. विवेकानंद चौक पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुध्द पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास उपनिरीक्षक मानुल्ला करीत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या