सोने पळविणाऱ्या आरोपींना अटक, 10 तोळे सोने जप्त

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । राहाता

राहाता शारदा शाळेजवळून रखमाजी शिंदे याच्या पिशवीतील पळविलेले 31 तोळे सोने चोरी करणार्‍या तीन आरोपींपैकी दोघांना पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. या आरोपींकडून 10 तोळे सोने  हस्तगत केले आहे.

8 जून रोजी रखमाजी शिंदे हे ज्येष्ठ नागरिक युनियन बँकेतून आपले गहाण ठेवलेले सोने सोडवून घरी जात होते. तेव्हा दोन अज्ञात इसमांनी दुचाकीवरून शिंदे यांची सोने असलेली पिशवी लंपास केली. शिंदे यांनी सोने चोरी केल्याची तक्रार पोलिसांत दाखल केली. पोलिसांनी तपास करून या चोरट्यांचा छडा लावला आणि आंध्रप्रदेशमधून दोघांना अटक केली तर दोघे अजूनही फरार आहेत. पोलिसांनी या दोघांकडून 10 तोळे सोने हस्तगत केले आहेत तर पुढील तपास सुरू आहे.