अबब! 20 हजार रुपये किलो मोदक

गणेशोत्सवात बाप्पाला आवडणाऱ्या मोदकांची सर्वाधिक खरेदी होते. यानिमित्त बाजारात आता पारंपारिक उकडीच्या मोदकांसह विविध प्रकारचे मोदक दाखल झाले आहेत. मात्र, नाशिकमधील एका मिठाईच्या दुकानातील मोदक सध्या भाव खाऊन जात आहेत. या दुकानातील मोदकाचे दर चक्क 20 हजार रुपये किलो आहेत. या मोदकामध्ये सोने आणि चांदीचे वर्ख असल्यामुळे हे मोदक इतके महागडे असल्याचे दुकानदाराने सांगितले.