पीएफ धारकांना खुशखबर; सरकार 8.5 टक्के व्याज एकरकमी देणार!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोना संकटातून देशाची अर्थव्यवस्था सावरत असतानाच केंद्र सरकारने देशातील कर्मचाऱयांच्या भविष्य निर्वाह निधी ठेवीवरील 2019-20 या वर्षाचे 8.5 टक्के व्याज एकरकमी खात्यात जमा करण्याचा निर्णय घेतला आहे. पीएफधारकांसाठी हा निर्णय दिलासादायकच ठरणार आहे. व्याजाची रक्कम वर्षअखेरीस उद्या 31 डिसेंबरला पीएफधारकांच्या खात्यात जमा होणार आहे. अर्थमंत्रालयाने पूर्ण व्याज एकरकमी देण्यास ईपीएफओला परवानगी दिली आहे. पीएफ धारकांना दिलासा देणाऱया या निर्णयासाठी केंद्रीय कामगार मंत्रालय आणि अर्थ मंत्रालयात विशेष बैठक याच आठवडय़ात पार पडली होती. यावेळी वरील निर्णय घेण्यात आला.