जानेवारीपासून हे बदल आवश्यक, नाहीतर तुमचं गुगल क्रोम बंद होऊ शकतं 

तंत्रज्ञान प्रगतीमुळे आता वर्ष बदलासोबत वेगवेगळे बदल करण्यात येतात. सध्या काही सर्च करायचं झालं तर कळत नकळत आपण गुगल क्रोम वापरतो. मात्र आता आवश्यक बदल न केल्यास तुमचं गुगल क्रोम बंद होऊ शकतं.

गुगलकडुन क्रोम सपोर्टबाबत एक निर्णय जाहीर करण्यात आला आहे. 1 जानेवारीपासून विंडोज 7 आणि विंडोज 8.1 साठी गुगल क्रोमचे नवे वर्जन सपोर्ट बंद करण्यात येईल. म्हणजेच ज्यांच्या लॅपटॉपमध्ये विंडोज 7 आणि विंडोज 8.1 आहे, त्यांना गुगल क्रोम वापरता येणार नाही. ज्यांचे लॅपटॉप जुने आहेत, त्यांना याची अडचण येऊ शकते.

गुगलकडून क्रोम सपोर्टसंदर्भात एक मोठा आणि महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयानुसार 1 जानेवारीपासून विंडोज 7 आणि विंडोज 8.1 साठी गुगल क्रोमचे नवे वर्जन सपोर्ट बंद करण्यात येणार आहे. म्हणजेच ज्यांच्या लॅपटॉपमध्ये विंडोज 7 आणि विंडोज 8.1 आहे, त्यांना गुगल क्रोम वापरता येणार नाही. ज्यांचे लॅपटॉप जुने आहेत, अशांची मोठी अडचण होऊ शकते.

गेमिंग सर्विसही होणार बंद

गुगल स्टेडीया गेमिंग सर्विस ही एक क्लाउड गेमिंग सर्विस जानेवारीपासून बंद होणार आहे. फक्त 18 जानेवारीपर्यंत ही सुविधा उपलब्ध असेल, त्यानंतर ही सुविधा बंद होईल. लोकप्रियता न मिळाल्याने ही सुविधा बंद करण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे.

दरम्यान,1 जानेवारीपासून ऑनलाईन पेमेंट करताना प्रत्येकवेळी कार्ड नंबर आणि एक्सपायरी डेट द्यावी लागणार, म्हणजेच या डिटेल्स आधीसारख्या ऑटो सेव्ह राहणार नाहीत. सुरक्षित पेमेंट साठी हा निर्णय घेण्यात आला आहे. आरबीआयच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे ऑनलाईन पेमेंट सुविधा अधिक सुरक्षित होणार असून ग्राहकांचा फायदा होणार आहे.