
एआयमुळे आयटी आणि अन्य सेक्टरमधील नोकऱ्यांवर विपरित परिणाम दिसू लागलाय. ज्या सेक्टरमध्ये तंत्रज्ञानाचा अधिक वापर होतो, त्यांना एआयचा फटका बसत आहे. अनेकांच्या नोकऱ्या जात आहेत. अशातच हेल्थकेअर सेक्टरचे काय, असा सवाल उपस्थित होतोय. एआयमुळे डॉक्टरांच्या नोकऱ्या धोक्यात येतील, पण नर्सची जागा एआय घेऊ शकत नाही, असे मत गुगल डीपमाईंडचे सीईओ डेमिस हसाबिस यांनी मांडले. काही निवडक डेटा इंटेंन्सिव कामामध्ये एआय डॉक्टरांची जागा घेण्यास सक्षम असेल असे डेमिस हसाबिस यांनी म्हटले.
एआय तंत्रज्ञान मानवाची जागा घेऊ शकत नाही, नर्सची जागा घेऊ शकत नाही, असे त्यांनी म्हटले. डॉक्टरांच्या तुलनेत एआयची ताकद जलद आणि अचूक आहे. स्पॅन, टेस्ट रिझल्ट, रुग्णाची मेडिकल हिस्ट्री आदीसह मोठ्या प्रमाणात डेटाचे विश्लेषण करण्याची एआयची क्षमता आहे. येत्या काळात माणूस आणि एआय एकत्र काम करतील, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.