
गुगलसारख्या कंपनीत बीटूबी अॅड प्रोडक्ट्समध्ये काम करणाऱ्या एका 27 वर्षीय तरुणाने ब्रेकअप झाल्यामुळे तब्बल 2.52 कोटी रुपये वार्षिक पगार असलेली नोकरी सोडली आहे. जिम टँग असे या तरुणाचे नाव असून तो मूळचा जपानचा आहे. जिम टँग हा गुगलमध्ये सॉफ्टवेअर इंजिनीअर म्हणून कार्यरत होता. ब्रेकअप झाल्याने नैराश्य आलेल्या जिमने मोठय़ा पगाराची नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला. जिम टँगने 2021 मध्ये गुगल जॉइन केले होते. गुगलमध्ये नोकरी मिळवणे हे त्याचे स्वप्न होते. गुगलमध्ये नोकरी मिळाल्यानंतर त्याच्या आई-वडिलांना प्रचंड आनंद झाला होता. गुगलमध्ये मोठय़ा पदावर नोकरी, मनासारखा पगार आणि अन्य सुविधा कंपनीकडून मिळत होत्या. परंतु, ब्रेकअप झाल्यानंतर जिम टँगचे कामात मन लागत नव्हते. तो कामाप्रती समाधानी नव्हता. त्यामुळे जिमने गुगलची नोकरी सोडून दुसरे काही तरी करण्याचा निर्णय घेतला. ज्या कामात आनंद मिळेल, असे काम करायचे जिमने ठरवले.
n गुगलमध्ये मोठा पगार, भरपूर सुविधा मिळत होत्या. परंतु, कॉर्पोरेटमध्ये जास्त दिवस काम करेल, असे वाटले नाही. जिम टँगने आता टोकियोमध्ये एक क्रिएटर आणि डॉक्युमेंट्री म्हणून काम करायला सुरुवात केली आहे. डिजिटल प्रोडक्ट्स बनवणे आणि कोचिंग सेवा देण्यावर फोकस केला आहे.