गुगल डाऊन! जीमेल, गुगलपेसह सहा सेवांमध्ये अडथळा नेटकऱ्यांची तारांबळ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जगातील सर्वात मोठी टेक कंपनी असलेल्या ‘गुगल’मध्ये बिघाड झाला आणि जगभरात हाहाकार उडाला. जीमेल, गुगल ड्राईव्ह, युटय़ूबसह सहा सेवांमध्ये सातत्याने अडथळा येत असल्यामुळे नेटकाऱ्यांची तारांबळ उडाली. गुगलमध्ये झालेल्या बिघाडाची तक्रार घेऊन नेटकाऱ्यांनी ट्विटर गाठले. दिवसभर ट्विटरवर गुगलच्या बिघाडाच्या तक्रारींचा पाऊस पडत होता.

दरम्यान, बिघाड दुरूस्तीसाठी युद्धपातळीवर काम सुरू असल्याचे गुगलने सांगितले आहे. गुरुवारी सकाळी 9 वाजता गुगलच्या सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या जीमेलमध्ये अडथळा आला. फाईल अटॅच होत नसल्यामुळे जीमेल वापरणारांची पंचाईत झाली. त्यानंतर लॉगईन व मेसेज रिसिव्ह होत नसल्यामुळे या अडचणीत भर पडली. त्याअगोदर युटय़ूबने मान टाकली. सोमवारी रात्रीपासूनच युटय़ूबवर व्हिडीओ अपलोडच होत नक्हते. त्यानंतर व्हिडीओ ओपनही होत नव्हते. काही काळानंतर वेबसाईटच ओपन होणे बंद झाले.

इंटरनेटचा अमर्याद वापर करणाऱया गुगलचे लॉगईन होत नसल्यामुळे नेटकरी वैतागले. गुगल ड्राईव्ह करूनही फाईल लिंक होणे बंद झाले. गुगलपेमध्येही अडथळे येत असल्यामुळे वापर करणारे ग्राहक वैतागले. सध्या सर्वाधिक वापर होत असलेल्या गुगल मीटमध्येही बिघाड झाला. जीमेल, गुगल ड्राईक्हकर कोणतीही फाईल अटॅच केली की वारंवार जंप होत असल्यामुळे नेटकऱयांची तारांबळ उडाली. गुगलमधील बिघाडाची तक्रार घेऊन नेटकरी ट्विटरकडे धावले. आज सकाळपासूनच ट्विटरवर गुगलमधील बिघाडाच्या तक्रारींचा पाऊस पडला. दरम्यान, गुगलने बिघाड दुरूस्त करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असल्याचे सांगितले आहे.