गुगल मॅपवरून गाडी चालवणं अंगलट, फुटपाथवर झोपलेल्या माणसाला चिरडले

463
प्रातिनिधिक

रस्ते शोधण्यासाठी गुगल मॅप्स हा एक आधुनिक मार्ग आहे. त्यामुळे त्याचा वापर सर्रास केला जातो. पण दिल्लीत गुगल मॅप बघत गाडी चालवणं अंगलट आलं आहे. कारण, मॅपमधलं वळण घ्यायच्या नादात एका माणसाने गाडी फुटपाथवर चढवली आणि तिथे झोपलेल्या माणसाला चिरडलं. या घटनेत जखमी झालेल्या त्या माणसाचा मृत्यू झाला आहे.

नवी दिल्लीतील मिंटो मार्गावर शनिवारी रात्री हा अपघात झाला. गाडीतील प्रवासी राजस्थानचे आहेत आणि दिल्लीहून परत आपल्या घरी निघाले होते. रस्ता कळावा म्हणून गाडीचा चालक गुगल मॅपमध्ये बघून वेगाने गाडी चालवत होता. मिंटो मार्गावर गाडी वेगात असताना गुगल मॅपने दाखवलेल्या वळणावर चालकाने गाडी वळवली आणि त्याचं गाडीवरचं नियंत्रण सुटलं. गाडी फुटपाथवर चढली आणि तिथे झोपलेल्या माणसाला चिरडलं.

या घटनेत त्या माणसाचा मृत्यू झाला. गाडीतला कोणताही प्रवासी जखमी झाला नाही. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला. मृत्युमुखी पडलेल्या माणसाची ओळख अद्याप पटलेली नाही.

आपली प्रतिक्रिया द्या