‘गुगल पे’वरील वर्षभराचा खर्चाचा हिशोब मिळणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गेल्या वर्षभरात गुगल पे, पेटीएम, फोन पे सारख्या ऑनलाईन पेमेंट अॅपला नागरिकांची मोठी पसंती मिळतेय. गेल्या वर्षभरात गुगल पे वरून आपण किती रुपये खर्च केले याचा हिशोब आता एका क्लिकवर मिळणार आहे. गुगल पे च्या रिसेंट ट्रान्स्झॅक्शन या पर्यायावर क्लिक केल्यावर इयर इन रिह्यू हा पर्याय दिसेल. यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही गुगल पे वर कधीपासून सक्रीय आहात. गेल्या वर्षभरात या अॅपवरून किती रुपये खर्च केले याची सविस्तर माहिती येथे पाहायला मिळेल. वर्षभरात किती कॅशबॅक मिळाला याचीदेखील माहिती येथे आहे.