अरे वा! आता चुकून डिलीट झालेले फोटोही परत मिळणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मोबाईलमधील फोटो सेव्ह करण्यासाठी सर्व जण गुगल फोटोजचा वापर करतात. त्यामुळे गॅलरीतून डिलीट झालेल्या फोटोंचा बॅकअप आपल्याला गुगल फोटोजमध्ये मिळतो. परंतु चुकून गुगल फोटोमधूनच फोटो डिलीट झाले तर? सोप्या स्टेप्स वापरून तिथून डिलीट झालेले फोटो आपण परत मिळवू शकतो. त्यासाठी गुगल फोटोज अॅपवर जा. उजव्या बाजूला तुम्हाला तीन लाईन दिसतील. त्यावर क्लिक करा. आता ट्रॅश किंवा बिन पर्याय निवडा.

जे फोटो तुम्हाला पुन्हा हवे असतील ते निवडा. फोटोंना निवडल्यानंतर रिस्टोअर बटनवर क्लिक करा. या गोष्टी केल्यानंतर तुमचे डिलीट झालेले सर्व फोटो परत मिळतील. गुगल फोटोमध्ये ट्रॅश सेक्शनमध्ये डिलीट केलेले फोटो 60 दिवसांपर्यंत उपलब्ध असतात. 60 दिवसांनंतर हे फोटो कायमचे डिलीट होतात. त्यानंतर ते फोटो रिस्टोअर करता येत नाहीत.