
गुगल कंपनीने गुगल फोटोजसाठी लॉक्ड फोल्डर फिचर आणले आहे. या फिचरच्या मदतीने युजरला आपले खासगी फोटो, व्हिडिओ सहज लपवता येतील. फोटो आणि व्हिडिओच्या सुरक्षिततेसाठी पासवर्ड किंवा फिंगर प्रिंट्सचा वापर करू शकतील. विशेष म्हणजे या फोल्डरमध्ये सेव्ह केलेले फोटो ग्रीड, सर्च,अल्मब किंवा मेमरीत दिसणार नाहीत.
- हे फिचर वापरण्यासाठी लायब्ररीमध्ये जाऊन युटीलिटी पर्याय निवडा. त्यात लॉक्ड फोल्डरमध्ये जाऊन या नव्या फिचरचा लाभ घेता येईल.



























































