गुगलच्या 280 चुका दाखवल्या, गुगलने दिलं 65 कोटींचं बक्षीस

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गुगलच्या चुका दाखवणाऱ्या एका तरुणाला गुगलने 65 कोटींचं बक्षीस दिलं आहे. अमन पांडेय असं या तरुणाचं नाव आहे. या तरुणाने गुगलला 280 चुका दाखवून दिल्या आहेत.

अमन हा इंदूर इथे राहतो. तो बग्समिरर नावाची कंपनी चालवतो. गुगलने गेल्या वर्षी आपल्या वेगवेगळ्या सेवांमध्ये बग रिपोर्ट करणाऱ्यांना 87 लाख डॉलरची नुकसानभरपाई दिली. याच अहवालात गुगलने अमन याचा विशेष उल्लेख केला आहे. बग्समिरर या कंपनीचा संस्थापक अमन पांडेय याने 280 चुका दाखवल्याचं गुगने म्हटलं आहे.

अमनने गेल्या वर्षी 232 बग रिपोर्ट केले आहेत. त्याने 2019मध्ये सर्वप्रथम रिपोर्ट केला होता, तेव्हापासून आतापर्यंत गुगलच्या अँड्रॉइट व्हल्नरेबिलिटी रिवॉर्ड प्रोग्रामसाठी 280 बग रिपोर्टिंग केलं आहे. अमनची कंपनी गुगल, अॅप्पल आणि तत्सम सॉफ्टवेअर कंपन्यांना त्यांची सुरक्षा यंत्रणा मजबूत बनवण्यासाठी साहाय्य करते.

सॉफ्टवेअरमध्ये व्हायरस शिरू शकेल, असे प्रोग्रॅम्स शोधणं, अन्य तांत्रिक अडचणींसाठी अल्गोरिदम तपासणं इत्यादी काम अमनची कंपनी करते. त्या अंतर्गतच अमनने गुगलला त्याच्या सॉफ्टवेअरमध्ये असलेल्या चुका दाखवून दिल्या. त्या बदल्यात गुगलने अमनला 65 कोटी रुपयांचं बक्षीस दिलं आहे.