गुगलवर एम. एस. धोनी सर्च कराल तर फसाल

764

गुगलवर एम. एस. धोनी सर्च कराल तर महागात पडेल. कारण हे नाव गुगलवर सर्च करणे सगळ्यात खतरनाक होऊन बसले आहे. हे नाव सर्च करतात हजारो लिंक्स समोर येतात. यातील अनेक लिंक्स युजर्सची माहिती चोरण्याचे काम करतात. त्यामुळे युजर्सचा डेटा अजिबात सुरक्षित नसल्याचेच उघड झाले आहे.

एम. एस. धोनीबद्दल युजर्स जेव्हा ऑनलाइन सर्च करतात तेव्हा हॅकर्स युजर्सची माहिती चोरतात. अनेकदा धोनीबद्दल लेटेस्ट बातमी मिळते, परंतु तो एक ट्रप असल्याचे समोर आले आहे. दरम्यान, सचिन तेंडुलकर, सनी लियोनी, राधिका आपटे, श्रद्धा कपूर या सेलेब्सचे नाव सर्च करतानाही धोका संभवत असल्याचे समोर आले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या