2019 मध्ये नेटकऱ्यांनी गुगलवर ‘या’ गोष्टींचा घेतला सर्वाधिक शोध, वाचाल तर हैराण व्हाल

इंटरनेटच्या या युगात कुठेही काहीही अडले तरी गुगलवर शोध घेतल्‍याशिवाय पाऊल पुढे जात नाही. जगातील सर्वात मोठे सर्च इंजिन असणाऱ्या गुगलवर काहीही शोधले तरी मिळते. आता 2019 या वर्षाचा शेवटचा आठवडा सुरू असून गुगलने यावर्षी हिंदुस्थानातील लोकांनी सर्वाधिक सर्च झालेल्या गोष्टींची यादी प्रसिद्ध केली आहे. यात लोकसभा निवडणूक (Lok Sabha Elections), चांद्रयान-2 (Chandrayaan 2) आणि कलम 370 (Article 370) हे मुद्दे आघाडीवर आहेत. यासह नेटकऱ्यांनी कबीर सिंह आणि अॅव्हेंजर्स एंडगेम सारखे चित्रपटही सर्वाधिक वेळा सर्च केले आहेत. पाहूया बातमीपासून ते क्रीडापर्यंत आणि व्यक्तींपासून ते चित्रपटापर्यंत सर्वाधिक सर्च झालेल्यांची यादी…

सर्वाधिक सर्च झालेले टॉपिक –
संपूर्ण वर्षभराचा विचार केला असता हिंदुस्थानमध्ये सर्वाधिक सर्च झालेल्या टॉपिकमध्ये क्रिकेट वर्ल्डकप (Cricket World Cup) टॉपवर आहे. यानंतर (Lok Sabha Elections), चांद्रयान-2 (Chandrayaan 2), कबीर सिंह (Kabir Singh), अॅव्हेंजर्स एंडगेम ( Avengers: Endgame) कलम 370 (Article 370) चा नंबर लागतो.

सर्वाधिक सर्च झालेल्या बातम्या –
बातम्यांचा विचार केला असतान 2019 मध्ये पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीचा निकाल (Lok Sabha election results) सर्वाधिक सर्च करण्यात आला. यानंतर इस्त्रोचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प चांद्रयान-2, जम्मू-कश्मीरमधून रद्दबातल केलेले कलम 370, हिंदुस्थान सरकारची पंतप्रधान शेतकरी योजना आणि सर्वाधिक गाजलेली महाराष्ट्र विधानसभा निवडणूकसंबंधी बातम्या सर्च केल्या गेल्या.

सर्वाधिक सर्च झालेल्या व्यक्ती –
गुगल इंडियाने प्रसिद्ध केलेल्या यादीत सर्वाधिक सर्च झालेल्यांमध्ये हिंदुस्थाना वायूसेनेचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान टॉपवर राहिले. यानंतर लता मंगेशकर, युवराज सिंह, आनंद कुमार आणि विकी कौशल यांचा नंबर लागला.

सर्वाधिक सर्च झालेले क्रीडा स्पर्धा –
2019 मध्ये देशातील नेटकऱ्यांनी क्रिकेट वर्ल्डकप, प्रो कबड्डी लीग, विंम्बल्डन, कोपा अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया ओपन या स्पर्धा सर्वाधिक सर्च केल्या.

गुगलला काय प्रश्न विचारले?
एखादी गोष्ट समजून घ्यायची असली अथवा त्याबाबत माहिती मिळवायची असल्यास नेटकरी गुगलवर व्हॉट (What)ने सुरुवात करून प्रश्न विचारतात. 2019 मध्ये हिंदुस्थानातील नागरिकांनी What is Article 370 हा प्रश्न सर्वाधिक वेळा गुगलला विचारला. यासह What is exit poll, What is a black hole, What is howdy Modi आणि What is e-cigarette हे प्रश्न सर्वाधिक वेळा सर्च करण्यात आले.

आपली प्रतिक्रिया द्या