सर्च केलेली माहिती खरी की खोटी… गुगलचे भन्नाट फीचर लवकरच

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गुगलवर सर्च केलेली माहिती खरी की खोटी, याची संपूर्ण माहिती देणारे भन्नाट फीचर लवकर येणार आहे. या फीचरमुळे गुगलवर आपण सर्च केलेली माहिती नेमकी कुठून येते हे युजरला समजेल. त्यामुळे युजरला त्या साईटवर किती विश्वास ठेवावा हे समजण्यास मदत होईल.

गुगलने नुकतीच ‘अबाऊट धिस रिझल्ट’ या फीचरची घोषणा केली आहे. हे फीचर गुगलवर सर्च केलेल्या गोष्टींच्या सोर्सबाबत माहिती देईल. याशिवाय ज्या वेबसाईटची ही लिंक आहे ती किती विश्वासार्ह आहे, याबाबतची माहिती युजर्सला मिळेल. यासाठी गुगल विकिपिडियासोबत काम करत आहे. हे फीचर या वर्षीच्या सुरुवातीला फेब्रुवारीत लाँच करण्यात आले होते. सुरुवातीला ते केवळ इंग्रजी भाषेच्या रिझल्टसाठी काम करेल.