
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
गुगल प्लस आणि गुगल प्ले आर्टिस्ट हब या सेवा बंद केल्यानंतर गुगल आता आणखी एक सेवा बंद करण्याच्या तयारीत आहे. गुगल प्ले आर्टिस्ट हबही सेवा बंद करण्याच्या तयारीत गुगल आहे. यामागचे कारण म्हणजे गुगलला सध्या यूटय़ूब म्युझिकवर अधिक लक्ष केंद्रीत करायचे आहे. आवडत्या गीतकार, संगीतकारांची गाणी ऐकण्यासाठी गुगल प्ले आर्टिस्ट हब या सेवेचा उपयोग व्हायचा. 30 एप्रिलनंतर नवीन युजर्सना या सेवेचा वापरता येणार नाही. हे ऍप्लिकेशन सबक्राइब केल्यानंतर युजर आपल्याला हवी ती गाणी ऐकू शकत होते. 1 जुलैपासून हे ऍप्लिकेशन प्ले स्टोअरवरूनही हटवण्यात येणार असल्याची माहिती आहे.





























































