नवीन वर्षाच्या स्वागतासाठी गुगलचे डूडल झाले लाईव्ह, पार्टी थीमने जगभराचे लक्ष वेधले

गुगलचे डूडल हे अनेकांच्या कुतूहलाचा भाग असतो. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी आता गुगलचे डूडलही अपडेट झाले आहे. आज 31 डिसेंबर 2025 ला गुगलचे होमपेज एका खास नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला डूडलने सजवले आहे. यामध्ये डूडलची मुख्य थीम ही पार्टी आहे. यात रंगीबेरंगी फुगे, चकचकीत सजावट त्याचबरोबरीला 2025 ते 2026 पर्यंतचे संक्रमण अतिशय क्रिएटीव्ह पद्धतीने करण्यात आले आहे.

हे डूडल नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला समर्पित आहे. गुगल दरवर्षी नवीन वर्षाच्या संध्येला कायमच काही ना काही क्रिएटीव्ह करत आले आहे. यंदाच्या डूडलमध्ये 2025 सोबत 2026 ही दोन्ही वर्षे ठळकपणे अधोरेखित केली आहेत. त्यासोबत पार्टी थीम सादर केल्यामुळे सर्वांचेच लक्ष या डूडलने वेधले आहे.

गुगल हे कायमच हिंदुस्थानात माहितीच्या शोधासाठी वापरले जाते. काही खास दिवसांच्या निमित्ताने गुगलच्या अधिकृत लोगोच्या जागी अॅनिमेटेड फोटो आणि होवर टेक्स्ट ठेवतो. त्यालाच गुगलचे डूडल असे म्हणतात. गुगल खासकरुन डूडल सुट्टी, कार्यक्रम, विशिष्ठ देशाची किंवा व्यक्तीची उल्लेखनीय कामगिरी, ऐतिहासिक व्यक्तिमत्त्व यासारखे डूडल तयार करते. एखादा दिवस साजरा व्हायला हवा आणि त्या दिवसाचे महत्त्व सर्वांना कळावे हाच यामागील मुख्य उद्देश आहे. डूडल गुगलच्या फ्रंट पेजवरील गुगल लोगोच्या जागी काही वेळेसाठीच ठेवले जाते. म्हणजेच एका खास दिवशीनिमित्त ठेवले जाते. आज जगभरात सर्वजण नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सज्ज झालेले आहे. म्हणूनच गुगलने यानिमित्त पार्टी थीम असलेले डूडल आणलेले आहे. गुगलचे हे डूडल देखील नेहमीसारखेच युनिक आहे.