दोन मुलांची आई इन्स्टाग्रामवर पडली प्रेमात, अल्पवयीन मुलासोबत झाली फरार

गोरखपुरमध्ये एक विचित्र घटना घडली आहे. इन्स्टाग्रामवप दोन मुलांच्या विधवा आईने एका अल्पवयीन मुलासोबत फरार झाली आहे. मुलाच्या पालकांनी मदतीसाठी पोलिसांत धाव घेतली आहे.

पिडीत मुलाच्या आईने केलेल्या तक्रारीनुसार, सोळा वर्षीय मुलगा नणंदेच्या वहिनीशी संपर्कात होता. दोघांची ओळख सोशल मीडीया साईट इन्स्टाग्रामच्या माध्यमातून झाली होती. दोघंही बराच काळ इन्स्टावर बोलायचे. ती महिला कायम आपल्या बहिणीच्या घरी यायची आणि तिथे मुलाला भेटायची. कालांतराने मुलाचे वागणे संशयास्पद वाटल्याने त्याची आई त्याला तिथे ओरडली. मात्र काही दिवसांनी ती महिला मुलाला घेऊन बेपत्ता झाली. तेव्हापासून दोघांचा काही पत्ता नाही आणि दोघांचे फोनही बंद येत आहेत.

याप्रकरणी गोरखपूर पोलीस तपास करत आहेत. पोलिसांनी अल्पवयीन मुलाच्या आईच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करुन घेतला आहे, पोलीस दोघांचाही शोध घेत आहेत.