गोवंडीत निट्रावेटच्या तीन हजार गोळ्या जप्त

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नशेबाजांना विकण्यासाठी आणलेल्या निट्रावेट-10 एमजी या अंमली पदार्थाच्या तीन हजार गोळ्या शिवाजीनगर पोलिसांनी गोवंडीच्या घाटला परिसरात जप्त केल्या. या गोळ्या घेऊन जाणाऱ्या तरूणाला अटक करण्यात आले.

घाटला परिसरातून बालकिशन सोनी (37) हा तरुण निट्रावेट या अमलीपदार्थाचा साठा घेऊन जाणार असल्याची खबर एपीआय धनंजय देवडीकर यांना मिळाली. त्यानुसार वरिष्ठ निरीक्षक अर्जुन रजाने यांच्या मार्गदर्शनाखाली देवडीकर तसेच शिंदे, मोरे, घारे, कुंभारे या पथकाने त्या ठिकाणी सापळा रचून सोनी तेथे येताच त्याच्यावर झडप घातली.

त्याच्या हातात असलेल्या पिशवीची तपासणी केली असता त्यात निट्रावेट-10 एमजी या अमली पदार्थाच्या गोळ्यांचे 10 बॉक्स सापडले. पोलिसांनी या दोन लाख किमतीच्या गोळ्या आणि अन्य साहित्य हस्तगत केले.