मराठा विद्यार्थ्यांना निम्मे शुल्क भरून प्रवेश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक फोटो

सामना प्रतिनिधी । मुंबई

मराठा समाजातील आठ लाखांपेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेल्या विद्यार्थ्यांना विविध अभ्यासक्रमांमध्ये निम्मे शुल्क घेऊन प्रवेश देण्याच्या सूचना प्रत्येक महाविद्यालयाला देण्यात आल्या आहेत. निम्मे शुल्क भरून प्रवेश न देणाऱयांवर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती महसूलमंत्री तथा मराठा आरक्षणासंदर्भात नेमलेल्या उपसमितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली.

मराठा मोर्चाच्या पार्श्वभूमीवर निर्णयांचा आढावा घेण्यासाठी नेमलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक आज चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. याविषयीची माहिती देताना चंद्रकांत पाटील म्हणाले, मराठा समाजातील विद्यार्थ्यांना विविध व्यावसायिक व बिगरव्यावसायिक अभ्यासक्रमासाठी निम्मे शुल्क भरून प्रवेश देण्याच्या लेखी सूचना सर्व महाविद्यालयांना देण्यात आल्या आहेत. या विद्यार्थ्यांचे निम्मे शुल्क राज्य शासन भरणार आहे. जूनपासून सुरू होणाऱया प्रकेश प्रक्रियेसाठी ही योजना लागू राहणार आहे.