जमीन मालकांना नुकसानभरपाई देण्यास सरकार कटिबद्ध! राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाची  याचिका हायकोर्टाने फेटाळली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

एखादा खासगी भूखंड ताब्यात घेण्याचा सरकारला अधिकार आहे त्याप्रमाणे जमीन मालकांना नुकसानभरपाई देण्यासही सरकार कटिबद्ध आहे असे स्पष्ट करत मुंबई उच्च न्यायालयाने नाशिकमधील दोन महिलांना दिलासा दिला. हायकोर्टाने नुकसानभरपाई न देण्याची राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाची मागणी फेटाळून लावली.

नाशिकमधील मालतीबाई पवार आणि उज्वला थोरात यांची राहुद येथे जागा असून महामार्ग रुंदीकरणात एनएचआयने अनुक्रमे 3 हजार व 1 हजार 900 चौ मी जागा ताब्यात घेतली. नाशिकच्या डेप्युटी कलेक्टरानी प्रति चौमी च्या बदल्यात जमीन मालकांना 2700 रुपये देण्याचे आदेश दिले नंतर ही रक्कम 2200 इतकी करण्यात आली.

या निर्णयाला राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने सत्र न्यायालयात आक्हान दिले. सत्र न्यायालयाने दिलासा देण्यास नकार दिल्याने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने हायकोर्टात आक्हान दिले. न्यायमूर्ती मिलिंद जाधव यांच्या समोर या प्रकरणी सुनावणी घेण्यात आली. 2007 साली जागा ताब्यात घेण्यासंदर्भात अधिसूचना काढण्यात आली. 2009 साली जागेचा मोबदला मिळणे आवश्यक असताना अनेक वर्षे उलटूनही त्यांना मोबदला मिळालेला नाही. असे निरीक्षण नोंदवत हायकोर्टाने प्राधिकरणाला धारेवर धरले.