
सरकारी कर्मचाऱयांच्या वेतनात झालेली वाढ तसेच निवासस्थानांच्या सुविधा पुरविण्यासाठी लागणाऱ्या खर्चात झालेली वाढ लक्षात घेऊन सार्वजनिक बांधकाम किभागाने सरकारी कर्मचाऱ्यांच्या निवासस्थान सेवाशुल्कात दुपटीने वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. 1 फेब्रुवारी 2023 पासून ही वाढ वसूल केली जाणार आहे. वेतन स्तरानुसार आणि क्षेत्रफळानुसार हे सेवाशुल्क आकारण्यात येणार आहे. 220 चौरसफुटांसाठी 220 रुपये, 221 ते 320 चौरसफुटांसाठी 270 रुपये, 321 ते 420 चौरसफुटांसाठी 370 रुपये, 421 ते 550 चौरसफुटांसाठी 490 रुपये, 551 ते 750 चौरसफुटांसाठी 650 रुपये, 751 ते 1110 व त्याहून अधिक चौरसफुटांसाठी 930 रुपये सेवाशुल्क आकारण्यात येणार आहे.





























































