मनोज जरांगे यांना मुंबईत आंदोलनाची मिळाली परवानगी, मात्र अटी लागू

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखालील आंदोलनाला अखेर सरकारने मुंबईत परवानगी दिली आहे. मनोज जरांगे यांना १९ ऑगस्ट रोजी सकाळी ९ ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत आझाद मैदानावर एकदिवसीय आंदोलनाला मंजुरी मिळाली. मात्र यासाठी अटी लागू करण्यात आल्या आहेत.

काय आहेत अटी?

मिळालेल्या माहितीनुसार, फक्त पाच हजार आंदोलकांना आझाद मैदानात प्रवेश मिळेल. तसेच मनोज जरांगे यांच्यासह केवळ पाच वाहनांना मैदानापर्यंत जाण्याची परवानगी आहे. इतर वाहने इस्टर्न फ्री वे मार्गे वाडीबंदर जंक्शनपर्यंतच येऊ शकतील. आंदोलकांना ठरलेल्या मार्गातूनच मोर्चा काढावा लागेल. परवानगीशिवाय ध्वनिक्षेपक वापरता येणार नाही, तसेच आझाद मैदानात अन्न शिजवणे किंवा कचरा टाकणे यावर बंदी आहे. परवानगी मिळाल्यानंतर जरांगे यांनी सरकार आणि कोर्टाचे आभार मानले असून, “एका दिवसाची परवानगी दिली असेल, तर एकाच दिवसात आमच्या मागण्या मान्य करा,” असे ते म्हणाले आहेत.