
नेव्हिगेशनसाठी गूगल मॅप्स अत्यंत विश्वासार्ह मानले जाते. परंतु तेही अनेकदा चुकते. त्यामुळे कधी गाडी खाडीत जाते तर कधी तुटलेल्या पुलावरून कोसळते. तसेच मॅपिंग एरर संदर्भात सध्या कोणताही कायदा अस्तित्वात नाही. त्यामुळे गुगल मॅपची समस्या अधिक गंभीर आहे. परंतु, आता गूगल मॅप चुकवणार नाही. कारण मॅपिंग अटींवर कायदा आणण्याच्या प्रयत्नात सरकार आहे. गूगल मॅप्सच्या दिशाभूल करणाऱ्या मार्गदर्शनामुळे जीवघेण्या घटना घडल्या आहेत. या अपघातांच्या पार्श्वभूमीवर नीती आयोग आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय मॅपिंग त्रुटींवर नियंत्रणआसाठी स्वतंत्र धोरण तयार करण्याचा विचार करत आहे. येत्या काळात एआय म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित नेव्हिगेशन प्रणालींमध्ये हाय रिस्क रूट वार्ंनग आणि रिअल टाइम फीडबॅकसारख्या सुविधा बंधनकारक करण्याचा प्रस्ताव आहे. तज्ञांच्या मते, देशात पत्ते आणि रस्त्यांचे एकसमान मानक नाही.






























































