
राज्य सरकारसोबत माझा कोणत्याही प्रकारचा संघर्ष नाही. तसे मी मानतही नाही. सरकारच्या प्राथमिकता असतात. त्यानुसार ते काम करीत असते. सर्वच माझे मित्र आहेत असे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज स्पष्ट केले. कंगना राणावत प्रकरणात सरकारकडे कोणतीही नाराजी व्यक्त केली नाही असेही ते म्हणाले.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या कारकीर्दीला ५ सप्टेंबर रोजी एक वर्ष पूर्ण झाले. या एका वर्षाच्या कारकिर्दीला आढावा घेणाNया ‘जनराज्यपाल-भगतसिंह कोश्यारी’ या कॉफी टेबल बुकचा प्रकाशन सोहळा राजभवनावर आयोजित करण्यात आला होता. त्यानिमित्त राज्यपालांनी पत्रकारांशी मनोकळ्या अनौपचारिक गप्पा मारल्या. मराठी भाषा, महाराष्ट्रातील राजकारण, तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहाटेच्यावेळेस राजभवनावर घेतलेली शपथ, कंगना राणावत प्रकरण, राज्य सरकार व राज्यपाल संबंधांवर मनमोकळी उत्तरे दिली. राज्यपाल पत्रकार परिषदेला सामोरे जात नाहीत. पण त्यांनी सर्व राजशिष्टाचार बाजूला ठेवत गप्पांची मैफलच रंगवली.
सरकारसोबत संघर्ष नाही
राजभवन व राज्य शासनाच्या समन्वयाबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की, आमच्या दोघांमध्ये कोणतेही मतभेद नाहीत. दोन भांडी असतील तर आवाज येणारच असे मानणाNयांपैकी मी आहे. राज्य सरकारच्या प्राथमिकता असतात त्या त्या पूर्ण करण्याचे प्रयत्न केले जातात. पण लोकांना वाटते की राजभवनाचा व सरकारचा संघर्ष नाही. असे त्यांनी स्पष्ट केले.
पहाटेचा शपथविधी
तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजभवनावर पहाटेच्यावेळेस शपथविधी सोहळा केला होता. त्या संदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले, त्यांनी रामप्रहरी शपथ घेतली. तर त्यांच्यावर तुम्ही प्रहार का करता असा प्रतिप्रश्न केला.
मी नाराज नाही
कंगनाबाबत राज्यपालांनी राज्य सरकारकडे नाराजी व्यक्त केल्याचे वृत्त काही वर्तमानपत्रात प्रसिध्द झाले होते. त्या संदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना राज्यपाल म्हणाले माझी नाराजी तुम्ही कशी पाहिली, मी नाराज असल्याचे वक्तव्य तुमच्याकडे केले का असा प्रतिप्रश्न राज्यपांलांनी केला. राग आला आहे असे कधी बोललो का, तुम्ही लिहिता त्याचा खुलासा मी करीत बसलो नाही. पण ज्या पत्रकाराने ही बातमी छापली तोच नाराज असेल असा टोला त्यांनी मारला.
तर मराठीत भाषण करेन
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे विधिमंडळातील अभिभाषण मराठीतूनच वाचतात. त्यांना आता मराठी समजते देखील. त्यावर विचारले असता राज्यपाल म्हणाले, मला आता मराठी चांगल्या रितीने समजते. थोडे फार मराठी मी आवर्जुन बोलतो. पण येत्या वर्षभरात मी अस्खलितपणे मराठीतूनच संवाद साधण्याचा निश्चय केला आहे.
मुद्दई सुस्त, गवाह चुस्त
राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या नियुक्तीच्या बाबत विचारले असता राज्यपालांनी हिंदीतील ‘मुद्दई सुस्त, गवाह चुस्त’ ही म्हण ऐकवून दाखवली. म्हणजेच ज्याचे काम आहे त्यालाच घाई नाही तर मला का त्याचा दोष देता असा त्याचा अर्थ होतो, असे राज्यपाल म्हणाले.

























































