राज्यपाल रमेश बैस यांनी घेतली  मराठीतून शपथ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल रमेश बैस यांनी आज राज्यपालपदाची शपथ घेतली. मुंबई उच्च न्यायालयाचे प्रभारी मुख्य न्यायमूर्ती संजय गंगापूरवाला यांनी राज्यपालांना  शपथ दिली. राज्यपाल बैस यांनी मराठीतून शपथ घेतली. ते महाराष्ट्राचे 20 वे राज्यपाल आहेत.

राजभवनातील दरबार हॉलमध्ये झालेल्या शपथविधी सोहळय़ाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, मुंबईचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा उपस्थित होते. शपथविधीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यपालांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. शपथविधी सोहळय़ानंतर भारतीय नौदलातर्फे राज्यपालांना मानवंदना देण्यात आली. राज्यपाल रमेश बैस यांनी शपथ घेतल्यानंतर प्रभादेवीतील सिद्धिविनायक  व महालक्ष्मी मंदिरात जाऊन दर्शन घेतले. यावेळी त्यांच्या पत्नी रामबाई बैस तसेच कुटुंबीय उपस्थित होते