
संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या विधान परिषदेच्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघांतील निवडणुकांच्या मतमोजणीला उद्या सकाळी आठ वाजल्यापासून सुरुवात होणार आहे. मात्र सर्व निकाल जाहीर होण्यास शुक्रवारची पहाट उजाडण्याची चिन्हे आहेत.
विधान परिषदेच्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघातील पाच जागांसाठी 1 डिसेंबर रोजी मतदान झाले. नागपूर पदवीधर, संभाजीनगर पदवीधर व अमरावती शिक्षक मतदारसंघ अशा पाच मतदारसंघांत मतदान झाले. 3 डिसेंबरला निकाल जाहीर होणार आहेत.
त्यानुसार सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरुवात होईल. या निवडणुकीत मतपत्रिकांचा वापर करण्यात आला. त्यामुळे मतपत्रिकांची सर्व प्रक्रिया पार पाडून प्रत्यक्षात मतमोजणीच्या कामाला संध्याकाळी सुरवात होईल.
त्यामुळे पहिला निकाल मध्यरात्रीनंतर येण्याची शक्यता आहे. पाचही जागांचे संपूर्ण चित्र स्पष्ट होण्यास गुरुवारची पहाट किंवा सकाळ होईल, असा अंदाज निवडणूक अधिकाऱयांनी व्यक्त केला.

























































