कोल्हापूर जिह्यात 73.22, साताऱ्यात 80 आणि सांगलीत 81 टक्के मतदान

कोल्हापूर जिह्यातील गेल्या वर्षी मुदत संपलेल्या आणि बिनविरोधनंतर उर्वरित 386 ग्रामपंचायत निवडणुकीसाठी आज दुपारपर्यंत 73.22 टक्के मतदान झाले. किरकोळ प्रकार वगळता शांततेत मतदान झाले. काही मतदान केंद्रांवर ईव्हीएम मशीन बंद पडल्याचे समोर येताच, तत्काळ पर्यायी यंत्रणा सुरू करून मतदान पूर्ववत सुरू करण्यात आले. सर्वाधिक मतदान गगनबावडा तालुक्यात 80.6 टक्के झाले होते, तर हातकणंगले तालुक्यात सर्वांत कमी 66.22 टक्के झाले होते.

कोल्हापूर जिह्यातील 433 ग्रामपंचायतींची निवडणूक होत असून, 47 ग्रामपंचायती आणि 720 उमेदवार बिनविरोध निवडून आले. त्यामुळे आज उर्वरित 386 ग्रामपंचायतींसाठी अत्यंत चुरशीने आणि इर्षेने मतदान झाले. 1 हजार 345 प्रभागांत आपले राजकीय भवितव्य आजमावण्यासाठी निवडणूक रिंगणात एकमेकांविरोधात उभे राहिलेल्या तब्बल 7 हजार 657 उमेदवारांचे भवितव्य आज ईव्हीएम मशीनमध्ये बंद झाले. यामध्ये 3 हजार 701 महिला उमेदवारांचा समावेश आहे.

जिह्यात 1 हजार 553 मतदान केंद्रांवर कडक पोलीस बंदोबस्तात सकाळी साडेसात वाजता मतदानाला सुरुवात झाली. ग्रामीण भागात शेतीकामांमुळे सकाळपासूनच मतदानाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत मतदारांनी मतदान केंद्राबाहेर रांगा लावल्याचे पाहावयास मिळत होते. सडोली खालसा (ता. करवीर) येथील प्रभाग क्रमांक 2चे ईव्हीएम मशीन चाचणी घेतानाच बंद पडले.

साताऱयात 80 टक्के मतदान

सातारा जिह्यातील 652 ग्रामपंचायतींसाठी आज चुरशीने मतदान झाले. किरकोळ प्रकार वगळता एकूणच मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. प्राथमिक माहितीनुसार जिह्यात सरासरी 80 टक्के मतदारांनी गावकारभारी निवडण्यासाठी आपला मतदानाचा हक्क बजावला. सर्वत्र कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

जिह्यातील 652 ग्रामपंचायतींच्या 7 हजार 264 जागांसाठी शुक्रकारी सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच काजेपर्यंत 2 हजार 38 केंद्रांकर मतदान घेण्यात आले. मतदानासाठी 2 हजार 38 पोलीस नेमण्यात आले आहेत. 17 हजार 429 कर्मचारी मतदानाच्या कामांत गुंतलेले होते. सकाळी साडेसात काजता उमेदकारांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत मतदान मशीनचे प्रात्यक्षिक करण्यात आले. त्यानंतर मतदानाला सुरुकात झाली. बहुतांश मतदान केंद्रांकर रांगा पाहायला मिळत होत्या. तर काही मतदान केंद्रांकर निकडणूक कर्मचाऱयांना मतदारांची काट पाहाकी लागली. आज मतदान झालेल्या ग्रामपंचायतींची तालुकानिहाय संख्या – सातारा 89, कराड 87, पाटण 72, कोरेगाव 49, वाई 57, खंडाळा 50, महाबळेश्वर 14, फलटण 74, जावली 37, माण 47, खटाव 76.

सांगली जिह्यात 81 टक्के मतदानाचा अंदाज

सांगली जिह्यातील 142 ग्रामपंचायत निवडणुकीसाठी आज अत्यंत चुरशीने मतदान झाले. दुपारी साडेतीन वाजेपर्यंत 68.10 टक्के मतदान झाले होते. जिह्यात सरासरी 81 टक्के मतदान होण्याचा अंदाज निवडणूक विभागाने व्यक्त केला आहे.

सांगली जिह्यातील 143 ग्रामपंचायत निवडणुकीसाठी आज सकाळी मतदानाला सुरुवात झाली. पहिल्या दोन तासांत 12.53 टक्के मतदान झाले. गावोगावी मतदानासाठी मतदारांना मतदान केंद्रावर नेण्यासाठी मोठी चुरस पाहायला मिळत होती. मिरज तालुक्यातील कवठेपिरान गावात 85 वर्षांच्या विठाबाई वसंत पाटील या वृद्धेने मतदानाचा हक्क बजावला.

आपली प्रतिक्रिया द्या