सहकारमंत्री बाळासाहेब पाटील गटाची ग्रामपंचायत निवडणुकीत बाजी

कराड उत्तर मतदार संघामध्ये सहकारमंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला यश मिळाले आहे. बाळासाहेब पाटील यांच्या गटाला 32, माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण गटाला 10, डॉ. अतुल भोसले गटाला 19 तर विलासकाका पाटील गटाला 9 ग्रामपंचायतीमध्ये यश मिळाले आहे. कराड तालुक्यातील 14 ग्रामपंचायतीमध्ये सत्तांतर झाले आहे.

कराड उत्तर मतदार संघामध्ये एकूण 87 ग्रामपंचायतींच्या निवडणूकीचा निकाल जाहीर झाला असून यामध्ये राज्याचे सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एकूण 71 ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व मिळवले आहे. कराड तालुक्यात 39 पैकी 32, सातारा तालुक्यातील 22 पैकी 19, कोरेगाव तालुक्यातील 12 पैकी 9, खटाव तालुक्यातील 12 पैकी 11 ग्रामपंचायतीवर मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या गटाची सत्ता स्थापन झाली आहे. सैदापूर, पाल, बनवडी, पार्ले, येरवळे, तांबवे, साकुर्डी नांदगाव, तासवडे, विंग, उंब्रज यासह 14 या गावांमध्ये सत्तांतर झाले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या