
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त भारतीय कामगार सेनेच्या वतीने सांताक्रुझ येथील ग्रॅण्ड हयात हॉटेलमध्ये भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात तब्बल 305 कर्मचाऱ्यांनी रक्तदान केले.
मुंबईतील वाढत्या रक्त तुटवड्याची गरज पाहता भारतीय कामगार सेनेच्या वतीने चिटणीस मनोज धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली यंदाही ग्रॅण्ड हयात हॉटेलमध्ये भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबिराला शिवसेना नेते-खासदार संजय राऊत, भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष, शिवसेना नेते-खासदार अरविंद सावंत, शिवसेना नेते-खासदार अनिल देसाई, शिवसेना सचिव विनायक राऊत, शिवसेना नेते-आमदार ऍड. अनिल परब, शिवसेना नेते-आमदार सुनील प्रभू, भारतीय कामगार सेनेचे सरचिटणीस शिवसेना उपनेते-आमदार सचिन अहिर, शिवसेना सचिव-आमदार वरुण सरदेसाई, आमदार संजय पोतनीस, भारतीय कामगार सेनेचे कार्याध्यक्ष अजित साळवी, संयुक्त सरचिटणीस संजय कदम, दिलीप जाधव, सदा परब, नगरसेविका शर्वरी परब, चिटणीस संतोष कदम तसेच हॉटेल व्यवस्थापनाकडून रॉबर्ट डोलीमोर, एच.आर. हेड नम्रता शर्मा, हॉटेल मॅनेजर सुमिन दत्ता, हॉटेल रूम्स डायरेक्टर शिखा खन्ना, युनिट कमिटीकडून सहचिटणीस प्रशांत नाईक, कार्यकारिणी सदस्य अभय प्रभू, उपाध्यक्ष सिद्धेश पांढरकामे, कुश गवस, संदेश परब, प्राजक्त तेली, संजय पानये, हीना शेख, मेघना पांदिलवार, हिमांशु पावसकर यांनी सहकार्य केले.

























































