इस्रायलकडून छळ झाल्याचा ग्रेटा थनबर्ग यांचा आरोप

पॅलेस्टिनीसाठी मदतीचे साहित्य घेऊन पोहोचलेल्या स्विडिशच्या पर्यावरणवादी कार्यकर्त्या ग्रेटा थनबर्ग यांना इस्रायलने ताब्यात ठेवले होते, परंतु ताब्यात असताना इस्रायलकडून आपला छळ करण्यात आला असा गंभीर आरोप ग्रेटा थनबर्ग यांनी केला. ग्रेटा यांनी पहिल्यांदा सार्वजनिकरीत्या हे आरोप केले. इस्रायलच्या सुरक्षा रक्षकांनी मला मारहाण केली. लाथ मारली. माझे हात बांधले. ज्या वेळी मी शांत झाले, त्या वेळी एका रांगेत सर्व जण माझ्यासोबत सेल्फी काढण्यासाठी उभे राहिले, असा आरोप ग्रेटा यांनी केला.