जेईई-नीट परीक्षा रद्द करा! पर्यावरण तज्ञ ग्रेटा थनबर्ग हिचा विद्यार्थ्यांच्या मागणीला पािंठबा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असतानाच, बिहार आणि गुजरात येथे आलेल्या पुरामुळे हजारो कुटुंब प्रभावित झाली आहेत. त्यामुळे केंद्र सरकारतर्फे घेण्यात येणाऱ्या जेईई आणि नीट सारख्या प्रवेश परीक्षा रद्द करण्याची मागणी जोर धरु लागली आहे. विद्यार्थ्यांच्या या मागणीला स्वीडनची पर्यावरण तज्ज्ञ ग्रेटा थनबर्ग हिने देखील पाठिंबा दर्शविला आहे. यासंदर्भात ट्विट करताना आपण हिंदुस्थानी विद्यार्थ्यांच्या मागणीला समर्थन दर्शवित असल्याचे तिने जाहीर केले आहे.

राष्ट्रीय परीक्षा एजेंसीतर्फे (एनटीए) जेईई आणि नेट परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार 6 सप्टेंबर रोजी जेईई तर 13 सप्टेंबर रोजी नीटची परीक्षा घेण्याचे जाहीर करण्यात आले आहे. मात्र कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता विद्यार्थी आणि पालकांकडून या परीक्षा रद्द करण्याची मागणी जोर धरु लागली आहे. अनेक राजकीय पक्षांकडून देखील यास्वरुपाची मागणी करण्यात आली आहे. मात्र त्यानंतर ही एनटीए परीक्षा घेण्याबाबत ठाम आहेत.

कोण आहे ग्रेटा थनबर्ग

17 वर्षीय ग्रेटा थनबर्ग ही 2019 साली चर्चेत आली होती. संयुक्त राष्ट्राच्या जलवायु परिषदेत तिने जगातील अनेक बड्या नेत्यांवर निशाणा साधत टीका केली होती. टाइम मॅगजीनतर्फे तिला ‘पर्सन ऑफ द इयर’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.