
प्रख्यात 8 चित्र-शिल्पकारांनी एकत्रितपणे सादर केलेल्या त्यांच्या निवडक कलाकृतींचे प्रदर्शन काळाघोडा येथील जहांगीर कलादालनात सुरू आहे. 10 जानेवारीपर्यंत हे प्रदर्शन सकाळी 11 ते सायंकाळी 7 या वेळेत विनामूल्य बघता येईल.
समूह प्रदर्शनात नवी दिल्ली, नोएडा, त्रिपुरा, कोलकाता व आसाम येथील कलावंतांनी भाग घेतला आहे. निताई दास, रानेन्द्र जीत, रेणू खंडेलवाल, सुभाष रॉय, शुभेन्दू कुमार दास, प्रलय दत्ता, नीलाक्षी बेझबोरूआ, गौर दास अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्या विविध माध्यमातील 50 हून अधिक कलाकृती प्रदर्शनात मांडण्यात आल्या आहेत.



























































