जीएसटी परिषदेची बैठक संपन्न, जाणून घ्या काय झाले स्वस्त

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली  

वस्तू आणि सेवा करच्या परिषदेची ३१ वी बैठक दिल्ली पार पडली. ही बैठक केंद्रिय अर्थमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली असून यात अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले गेले. पाँडिचेरीचे मुख्यमंत्री नारायणस्वामी यांनी दिलेल्या माहितीनुसार एकूण ३३ वस्तूंवर जीएसटी कर घटवण्यात आले आहे. अनेक वस्तूंवर १८ टक्के असलेला कर कमी करून तो १२ ते ५ टक्क्यांवर आणला आहे. तर ७ वस्तूंवरील २८ टक्के कर कमी करून १८ टक्के करण्यात आला आहे.

फूटवेअर वरील उत्पादनात काही ठिकाणी ५ टक्के कर आहे तर काही उत्पादनांवर १२ टक्के आहे. सर्व फुटवेअर उत्पादनांवर ५ टक्के कर लावण्याचा विचार या बैठकीत मांडण्यात आला. टीव्ही, मॉनिटर व पॉवर बँकवर २८ टक्के कर होता. तो कमी करून १८ टक्क्यांवर आणला आहे. धार्मिक यात्रांवरही कुठलेच अतिरिक्त शुल्क आकरले जाणार नाही असा निर्णय या बैठकीत घेण्यात आला आहे. सर्व धवाई धार्मिक यात्रांवर ५ टक्के जीएसटी असेल. पूर्वी इकॉनॉमी आणि चार्टेड प्लेनवर वेगवेगळे कर आकारले जात.

चित्रपट तिकिटांच्या करातही घट करण्यात आली आहे. १०० रुपयापर्यंत तिकीटीवरील कर १८ टक्क्यांवरून १२ टक्क्यांवर आणण्यात आला आहे. तर १०० रुपयांहून अधिक तिकिटांवर १८ टक्के जीएसटी लागेल, पूर्वी यावर २८ टक्के कर होता.