हॉटेल व्यावसायिकांना दिलासा,एक हजार रुपयांच्या रूमला जीएसटी माफ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जीएसटी लागू झाल्यापासून हॉटेल व्यवसायाला लागलेली घरघर आता थांबणार आहे. कारण जीएसटी काऊन्सिलच्या शुक्रवारी झालेल्या बैठकीत हॉटेल व्यावसायिकांना दिलासा देणारा निर्णय झाला आहे. यापुढे एक हजार रुपयांपर्यंतच्या रूमला जीएसटी माफ करण्यात आला असून 1001 ते 7500 रुपयांपर्यंतच्या रूमसाठी आता 12 टक्के जीएसटी भरावा लागणार आहे. विशेष म्हणजे 7500 रुपये भाडे असलेल्या रूमला पूर्वी 28 टक्के असलेला जीएसटी 18 टक्क्यांवर आणल्यामुळे घसरलेल्या हॉटेल व्यवसायाला आता नव्याने चालना मिळणार आहे.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली आज गोव्यात जीएसटी काऊन्सिलची बैठक झाली. या बैठकीत काही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. यावेळी माहिती देताना सीतारामन म्हणाल्या की, कॅफीनवाल्या पेय पदार्थांवर यापुढे 18 ऐवजी 28 टक्के जीएसटी लागेल. याव्यतिरिक्त 12 टक्के सेस लावण्याचेही सरकारने ठरविले आहे.

  • 10 ते 13 सीटर पेट्रोल वाहनांवरील कॅम्पेन्सिशन सेसमध्ये 3 टक्के सूट.
  • रेल्वे वॅगन, कोचवरील जीएसटी 5 वरून 12 टक्क्यांवर
  • हिरे व्यवसायातील जॉब वर्कवरील जीएसटी 5 टक्क्यांवरून दीड टक्क्यावर आणला.
  • आऊटडोअर कॅटरिंगवरील जीएसटी 13 टक्क्यांनी कमी झाला.