पाडव्याच्या पूजेला आंब्याचा गोडवा, एपीएमसीत हापूसच्या 17 हजार पेट्या दाखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गुढीपाडव्याच्या पूजेला आंब्याचा गोडवा यावा यासाठी कोकणसह देशाच्या कानाकोपऱयातून एपीएमसी मार्केटमध्ये हापूसच्या 17 हजार पेटय़ा दाखल झाल्या आहेत. गेल्या वर्षाच्या तुलनेत ही आवक निम्म्याने कमी असल्याने आंबा चढय़ा दराने विकला जात आहे. देवगड आणि रत्नागिरी हापूसची पेटी 6 ते 9 हजार रुपयांना विकली जात आहे. उद्या पाडव्याचा सण असल्यामुळे आज एपीएमसीच्या फळ मार्केटमध्ये हापूसच्या खरेदीसाठी किरकोळ व्यापाऱयांची एकच झुंबड उडाली.