अक्षर म्हणजे मोत्याचे दाणे

सुंदर आणि वळणदार हस्ताक्षर लिहिण्याची कला म्हणजे ‘कॅलिग्राफी’. आजकाल लिहिण्यासाठी संगणकाचा वापर होत असला तरी, सुबक लेखनाचे महत्त्व कधीही कमी होणार नाही. संगणकावर वेगवेगळ्या प्रकारचे फॉण्ट वापरले जातात, त्याचप्रमाणे कॅलिग्राफी या कलेद्वारेही करीयरचे अनेक पर्याय सध्या उपलब्ध होत आहेत.

विवाह पत्रिका, हस्तलिखते, संस्मरणीय कागदपत्रे, प्रमाणपत्र, निमंत्रण पत्रिका, बिझनेस कार्ड, मेन्यू कार्ड, भित्तीपत्रके, शुभेच्छा पत्रे, पुस्तकाचे मुखपृष्ठ, लोगो, कायदेशीर कागदपत्रे तसेच सिरॅमिक आणि मार्बलवरही कॅलिग्राफी लेखन केले जाते. कॅलिग्राफी शिकवणाऱ्या बऱ्याच संस्था आणि कोर्सेस उपलब्ध आहेत. काही ऑनलाइन कोर्सही करता येतो. यूटय़ुबवरही कॅलिग्राफी शिकवण्याचे प्रशिक्षण घेता येते. आवड म्हणून ही कला कोणत्याही क्षेत्रातील व्यक्तीला कधीही शिकता येऊ शकते.

प्रशिक्षण संस्था
> अच्युत पालव स्कूल ऑफ कॅलिग्राफी, 73, सेक्टर 17, वाशी, नवी मुंबई.
> कृपा फडके कॅलिग्राफी पर्सनल आणि ग्रुप क्लासेस, मुंबई
> गीतांजली क्लासेस, कांदिवली (पूर्व).
> ग्राफोलॉजी इन्स्टिटय़ूट वर्ल्ड स्कूल ऑफ हँण्डरायटिंग, सायन (पूर्व)
> मुक्ताक्षरे मराठी कॅलिग्राफी क्लासेस, दादर (प.)

आवश्यक गुण
> कॅलिग्राफीतील अक्षरे लिहिण्यासाठी लागणारे पेन, ब्रश यांच्याद्वारे अक्षरे साकारण्यासाठी एकाग्रता महत्त्वाची.
> नक्षीदार, वळणदार अक्षर काढण्याची आवड काही जणांमध्ये आधीपासूनच असते, तर काहींमध्ये ती नंतर निर्माण होते. दोघांनीही यामध्ये सतत नावीन्य शोधून वेगवेगळ्या विषयांवर काम करण्यासाठी निरीक्षण, शोधकवृत्ती, सजग असण्याची आवश्यकता आहे.
> शिकल्यानंतर कॅलिग्राफी अक्षरे लिहायला लगेच जमतात असे नाही, तर त्यासाठी ब्रश, रंग आणि पेनाच्या साहाय्याने सरावाची गरज आहे.

आपली प्रतिक्रिया द्या