भारीच! सवाचार किलोंच्या आंब्याचा गिनीज रेकॉर्ड

जगातील सर्वात वजनदार आंबा सवाचार किलोंचा असून त्याचे नाव गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये गेले आहे. हा भारी आंबा कोलंबियाच्या गुआयाता येथील सॅन मार्टीन फार्ममध्ये पिकवला आहे. जर्मन ऑरलॅंडो नोकोआ बरेरा आणि त्यांची पत्नी रिना मारिया मारोक्कीन यांनी या आंब्याची लागकड केली आहे. या आंब्याचे झाड अन्य झाडांच्या तुलनेत वेगाने वाढते. या फळाचा रंग सफरचंदासारखा लाल आहे. तसेच यात कोय आहे. याआधी वजनदार आंब्याचा रेकॉर्ड 2009 साली फिलिपाईन्समध्ये झाला होता. त्या वेळी आंब्याचे वजन तीन किलो 435 ग्रॅम एकढे भरले होते.

कोलंबियाच्या गुआयाता येथे आंब्याची लागवड फार थोडी होते. तिथले लोक फक्त आपल्या खाण्यापुरतं फळ पिकवतात. गुआयातामध्ये लोक जमीन आणि शेतीवाडीवर खूप प्रेम करतात. गुआयाता येथे 2014मध्ये 3199 चौरस मीटरचे फुलांची चटई बनवण्याचा रेकॉर्ड करण्यात आला होता.

आपली प्रतिक्रिया द्या