गुजरातवरून ऑक्सिजन आणण्याचा प्रयत्न

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ऑक्सिजनचा प्रश्न बऱयापैकी मार्गी लागला आहे. आपल्याला अगोदर 40 टन मिळत होता आता 50 टन मिळत आहे. अतिरिक्त एक टँकर गुजरातच्या जामनगरमधून मागवत आहोत. नाशिकच्या विमानतळावरून विमानाने रिकामे टँकर गुजरातला पाठवून ऑक्सिजनचे भरलेले टँकर रस्तामार्गे आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, अशी माहितीही गमे यांनी दिली.

कोपरगाव, राहाता, संगमनेर तिकडचे अनेक लोक नाशिक येथे बेडची मागणी करतात; बेड शिल्लक नाही हे मान्य केलं पाहिजे. जास्तीत जास्त ऑक्सिजन बेड कसे करता येईल, याचे नियोजन केले पाहिजे. 16 तारखेनंतर आपल्याला एक हजार ऑक्सिजनचे बेड तयार करायचे आहेत, तसे निर्देश जात दिले असल्याचे त्यांनी सांगितले. प्रत्येक तालुक्यात शंभर कॉन्सन्ट्रेटर विकत घ्या, असे सांगितले आहे. प्रत्येक तालुक्यामध्ये डय़ुरा सिलिंडर बसवता येईल का, याबाबतचा निर्णय घेण्यास सांगितले आहे, असेही गमे यांनी सांगितले.

रेमडेसिविर काही प्रमाणातच उपलब्ध

n रेमडेसिविर इंजेक्शन हे काही रामबाण औषध नाही, त्याच्यामुळे जीव वाचतो असे नाही, असे ट्रान्स्फोर्सने सांगितलेले आहे. मात्र, योग्यवेळी योग्य पेशंटला ते इंजेक्शन दिले तरच त्याचा उपयोग होतो, असेही म्हटले जात आहे. पूर्वी इंजेक्शन पावडरमध्ये येत होते, आता ते लिक्विडमध्येही मिळणार आहे. आजपासून त्याचे वाटप होणार आहे. ही इंजेक्शन्स काही प्रमाणामध्ये येत आहेत, असेही गमे यांनी सांगितले.