Breaking – गुजरातला भूकंपाचे तीव्र धक्के, लोकांनी घराबाहेर घेतली धाव

गुजरातला भूकंपाचे तीव्र बसले असून यामुळे घाबरून लोकांनी घराबाहेर धाव घेतली आहे. रविवारी रात्री 8 वाजून 13 मिनिटांनी हे धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता 5.8 एवढी होती. भूकंपाचा केंद्रबिंदू राजकोटपासून 122 किलोमीटर दूर होता.

गेल्या दशकातील हा सर्वात मोठा भूकंप होता..याआधी दिल्ली-एनसीआरमध्ये गेल्या काही दिवसात भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. भविष्यात येणाऱ्या मोठ्या भूकंपाचे हे संकेत असावे अशी भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

दरम्यान, गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपाणी यांनी राजकोट, कच्छ आणि पाटण जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवर संवाद साधला आणि परिस्थितीची माहिती घेतली. लोकांनी घाबरून जाऊ नये असे आवाहन त्यांनी केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या