
देशात कोरोनाचा प्रभाव वाढत असताना गुजरामध्ये अक्षरश: कोरोनाचा कहर झाल्याचे समोर आले आहे. यामध्ये एकट्या अहमदाबादमध्ये देशातील 24 राज्यांपेक्षा जास्त रुग्णांची नोंद झाली असून आतापर्यंत 3543 हून जास्त कोरोनाबाधित आढळले आहेत. पाच हजारांवर रुग्णसंख्या झाल्यामुळे गुजरात देशात सर्वाधिक रुग्ण असलेले दुसरे राज्य बनले आहे.
देशात कोरोनाबाधितांची संख्या आता 39 हजार 980 वर पोहोचली असून आतापर्यंत 1301 जणांचा मृत्यू आहे. यामध्ये महाराष्ट्रानंतर गुजरातमध्ये सर्वाधिक कोरोना रुग्ण आढळले आहेत. गुजरातमध्ये कोरोनारुग्णांची वाढ कायम असून 3 मे रोजी रुग्णांचा आकडाही 5 हजार 54वर गेला आहे. यामध्ये अहमदाबादमधील कोरोनाबाधितांची संख्या तर अनेक राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील रुग्णांपेक्षा जास्त असल्याने या ठिकाणी धोका वाढला आहे.
राज्यांतील कोरोना रुग्णांची स्थिती
– महाराष्ट्र : 12296 रुग्ण, 485 मृत्यू
– गुजरात : 5054 रुग्ण, 236 मृत्यू
– दिल्ली : 4122 रुग्ण, 61 मृत्यू
– मध्य प्रदेश : 2846 रुग्ण, 145 मृत्यू
– राजस्थान : 2770 रुग्ण, 62 मृत्यू
– तमिळनाडू : 2757 रुग्ण, 28 मृत्यू
– उत्तर प्रदेश : 2487 रुग्ण, 43 मृत्यू
– आंध्र प्रदेश : 1525 रुग्ण, 33 मृत्यू




























































