
केंद्रीय निवडणूक आयोगाने घेतलेल्या पत्रकार परिषदेत गुजरातमध्ये होणाऱ्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. गुजरातमध्ये 1 आणि 5 डिसेंबर असे दोन टप्प्यात मतदान होणार आहे आणि 8 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. गुजरातमध्ये विधानसभेच्या एकूण 182 जागांसाठी मतदान होणार आहे. गुजरातमध्ये सध्या भाजपची सत्ता असून इथे सध्याच्या घडीला भाजपचे 111 आमदार आहेत. काँग्रेस हा गुजरातमधील प्रमुख विरोधी पक्ष असून काँग्रेसचे गुजरातमध्ये 63 आमदार आहेत. गुजरातमध्ये एकूण 4.9 कोटी मतदार असून या सगळ्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावावा असे आवाहन करण्यात आले आहे.




























































