गुजरातमध्ये विजांच्या कडकडाटसह पावसाचे थैमान; चौघांचा मृत्यू

38

सामना ऑनलाईन। अहमदाबाद

गुजरातमध्ये वेगवेगळ्या भागात सतत पाऊस पडत आहे. या अतिवृष्टीमुळे गुजरातमध्ये 4 जणांचा मृत्यु झाला आहे. तर अनेक ठिकाणी वाढत्या जलपातळीमुळे नुकसान झाले आहे. दोन दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे नर्मदा नदीवरील सरदार सरोवर प्रकल्पातील जलपातळीत मोठी वाढ झाली आहे.

अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचले आहे. त्यामुळे रस्ते वाहतूक आणि जनजीवन विस्कळीत झाले आहे. गेल्या 24 तासांत नर्मदा धरणाची पाणीपातळी 23 सेंटीमीटरने वाढली आहे. सध्या धरणातील पाण्याचे प्रमाण 121.70 मीटर आहे. धरणामध्ये 32,874 क्यूसेक पाणीसाठा आहे. त्यापैकी 9207 क्युसेक पाणी सिंचनसाठी सोडण्यात  येते. तसेच गुजरातमधल्या 32 जिल्ह्यांत दोन दिवस मुसळधार पाऊस कोसळत आहे. आतापर्यंत दक्षिण गुजरातच्या धरमपूरमध्ये सर्वाधिक पाऊस नोंदवला गेला आहे. तसेच गुजरातमधील कोठसांगणई, चिखली, लिलिया, विशासवार टिंकारा, बिड, मालपूर, राजकोट याशिवाय ध्रंगधरा, बागसरा, धनसुर, भेशान, अमरेली, वल्लभपूर येथे जोरदार पाऊस पडला असून साबरकंठाच्या हिमतनगर येथे रात्री 2 मिनिटांत 50 मिलीलीटर पावसाची नोंद झाली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या