
कोरोना विषाणुमुळे देशात सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आलेले आहे.पुणे शहरातील अनेक भागात रोजंदारी निमित्त महाराष्ट्रात आलेले परप्रांतीय नागरीक अडकुन पडले आहेत.अन्नधान्य व पैशांमुळे त्यांची अडचण होत आहे, हडपसर भागात फुरूसुंगी येथे मागील 4 दिवसा पासुन बिहार येथील 10 ते 12 नागरीक उड्डाणपुलाच्या शेजारी राहात आहेत.ट
या नागरिकांनी बिहारचे शिवसेना राज्य प्रमुख कौशलेंद्र शर्मा यांना संपर्क साधला त्यांनी शिवसेनेचे पदाधिकारी किरण साळी यांना कळवले. त्यांनी युवासेना उपजिल्हा अधिकारी शादाब मुलाणी यांना सदर मजुरांना मदत करण्याचे सांगितले. शादाब मुलानी यांनी शिवसैनिकांना सोबत घेऊन संबंधित मजुरांशी संपर्क साधून त्यांना पुढील १५ दिवस पुरेल एवढा अन्नधान्यचा साठा उपलब्ध करून दिला.व सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. मिळालेली मदत पाहून त्या परप्रांतीय नागरिकांनी समाधान व्यक्त केले. त्यावेळी त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे व शिवसैनिकांचे आभार मानले.

































































