हाफीज सईदच्या न्यायालयीन कोठडीत 7 ऑगस्ट पर्यंत वाढ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । इस्लामाबाद

मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड व जमात उद दवाचा म्होरक्या हाफीज सईद याच्या न्यायालयीन कोठडीत 7 ऑगस्टपर्यंत वाढ करण्यात आली आहे. सध्या हाफीज हा लाहोरमधील कोट लखपत तुरुंगात कैद असल्याचे वृत्त आहे. मात्र काही वृत्त वाहिन्यांनी हाफिज हा त्याच्याच बंगल्यात नजरकैदमध्ये ठेवले असल्याचे बोलले जात आहे.

हाफिज सईदला गेल्या आठवड्यात पंजाब गुजरांवाला येथून टेरर फंडिंग व मनी लाँड्रिंग प्रकरणी अटक करण्यात आली होती. बुधवारी पाकिस्तानच्या दहशतवादीविरोधी पथकाने हाफीज सईदच्या न्यायालयीन कोठडीत 14 दिवसांची वाढ करण्यात आली आहे.